नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्डचा (Aadhar Card) वापर भारतात महत्वाचे कागदपत्र म्हणून केला जातो. ते ओळख म्हणून सर्वत्र वापरले जाते. लोकांचा अत्यावश्यक डेटा देखील येथेच असतो, यासाठी आधार कार्ड जारी करणारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने ग्राहकांसाठी आधार पडताळणीची प्रक्रिया (Aadhaar Authentication) सुरू केली आहे. (Aadhar Card)
परंतु, हे करण्यासाठी किंवा ऑनलाइन करण्यासाठी, तुमच्याकडून काही शुल्क आकारले जाते, जे पूर्वी 20 रुपये होते. मात्र आता ते बदलण्यात आले आहे. हा बदललेला नियम तुम्हाला माहीत नसेल तर तुमची अडचण होऊ शकते.
याबाबत माहिती देताना, यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गर्ग (uidai ceo saurabh garg) यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले की, आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्र आधारचा फायदा घेण्याची अधिक शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आता पडताळणीसाठी 20 रुपये प्रति पडताळणी शुल्क घेतले जाणार नाही. ते आता कमी करून रु. 3 केले आहे. यामुळे पडताळणीसाठी अधिक लोक आकर्षित होतील आणि विविध एजन्सी आणि संस्था सरकारने तयार केलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांचा अधिक चांगला वापर करू शकतील. (Aadhar Card)
इतक्या कोटी लोकांनी व्हेरिफिकेशन केले
आतापर्यंत देशातील 99 कोटी लोकांनी आधार व्हेरिफिकेशनसाठी ई-केवायसी आधार प्रणालीचा वापर केला आहे. आधार कार्डची सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, आधार कार्डचा कोणी गैरवापर केल्यास त्याच्यावर दंड आकारण्याची तरतूद आहे.
दुरुस्त्या करण्यासाठी भरावे लागते शुल्क
आधार कार्ड बनवण्यासाठी UIDIA कोणतेही शुल्क आकारत नाही. परंतु जर कोणी आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, ई-मेल इत्यादी अपडेट केले तर शुल्क भरावे लागते. डेमोग्राफिक अपडेट करायचे असल्यास 50 रुपये शुल्क आकारले जाते. तर बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते.
आधारसोबत इतर कागदपत्रे केली जात आहे लिंक
देशात आधार हा एक आवश्यक दस्तऐवज झाला आहे. या कारणास्तव, इतर कागदपत्र आधारसोबत लिंक केली जात आहेत. पॅनसोबत आधार लिंक करण्याची तारीख 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्याचबरोबर मतदार ओळखपत्रही आधारशी लिंक करण्यात येत आहे. याशिवाय आधार कार्ड पीएम किसान योजनेशी जोडले जात आहे. 54 मंत्रालयांच्या सुमारे 311 केंद्रीय योजना आधारचा वापर करून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्लॅटफॉर्म अंतर्गत येतात.
Web Title :- Aadhar Card | this change in the rules regarding aadhar card if you do not know you can be deprived of benefits