बहुजननामा ऑनलाइन टीम – जीवनसाथी वेबसाइटवरून ओळख तरुणीला(A young woman ) चांगलीच महागत पडली असून, त्याने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीला(A young woman ) 9 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
समीर जोशी ऊर्फ जगन्नाथ पाटुकले (रा. सातारा ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 29 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी उच्चशिक्षित आहे. ती एका कंपनीत नोकरीस आहे. लग्नासाठी तरुणीने जीवनसाथी वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्यानुसार समीर जोशी नावाने तरुणाने तरुणीशी ओळख वाढविली. एकमेकांशी फोनवरून संपर्क साधून विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी ऑनलाइनरित्या ९ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याने तरुणीचा व्हॉट्सअॅप क्रमांक ब्लॉक करून संपर्क बंद केला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक विकास राऊत करीत आहेत.