नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) नं संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नवीन सुविधा लागू केली आहे. त्याअंतर्गत युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) काढण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे कर्मचारी स्वतः ऑनलाइनद्वारे UAN मिळवू शकताूत. सध्या UAN साठी संघटनेने नेमलेल्यांकडून अर्ज भरावा लागत होता. त्यामुळे आता करोडो लोकांना या ऑनलाईन सुविधेचा फायदा होणार आहे.
तसेच EPFOने ६५ लाख पेन्शनधारकांसाठी एक विशेष सुविधा लागू केली आहे. ज्याद्वारे पेन्शनधारक पेन्शन पेमेंट सारखे इतर संबंधित कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये डाउनलोड करू शकता. EPFO च्या ६७व्या स्थपणा दिनानिमित्त कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी या दोन्ही सुविधा तसेच ई- निरीक्षणाची सुविधा देखील जाहीर केल्या आहेत.
दरम्यान काही दिवसांपासू EPFO ने पेन्शनची वयोमर्यादा ५८ वर्षांवरून ६० केली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आता EPF कायदा १९५२ मध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. जगातील बहुतेक पेन्शन फंडामध्ये पेन्शनचे वय हे ६५ ठरवलं आहे, त्यामुळे EPFO ने देखील वयोमर्यादेत बदल करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कामगारांचे निवृत्तीचे वय देखील वाढणार आहे. या प्रस्तावाला बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढे कॅबिनेट मंजुरीसाठी कामगार मंत्रालयात पाठविण्यात येणार आहे.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या