बहुजननामा ऑनलाइन टीम – नोकिया कंपनी सतत आपले आयकॉनिक फोन बाजारात आणत आहे. Nokia 3310 च्या वापसीस जबरदस्त रिस्पॉन्स मिळत होता. Nokia 3310 नंतर कंपनीने Nokia 8110 4G, बनाना फोन आणि Nokia 2720 फ्लिपला पुन्हा बाजारात आणले. यांनतर नोकिया 2020 मध्ये Nokia 5310 आणि Nokia 6300 घेऊन आले. यानंतर कंपनी आता आणखी एक आयकॉनिक फोन घेऊन येत आहे. हा फोन Nokia 3650 असण्याची शक्यता आहे.
यावर्षी येऊ शकतो Nokia 3650
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, नोकिया मोबाईल यावर्षी काही वेगळे करण्याच्या तयारीत आहे. कंपनी यावेळी Nokia 3650 बाजारात पुन्हा आणू शकते. दरम्यान, काही लोकांचा अंदाज होता कि, कंपनी Nokia N95 फोन परत आणेल. नोकियाचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर जूहो सारविकास यांनीही मॉडर्न N95 फोनच्या वर्किंग प्रोटोटाइपला दाखविले होते.
Nokia 3650 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia 3650 फोन 2003 मध्ये VGA कॅमेऱ्यासह आला होता. नोकियाचा हा फोन बॉटम पार्टमध्ये राऊंडेड होता, ज्यात एक सर्क्युलर कीबोर्ड देण्यात आला होता. 2.1 इंचाच्या TFT डिस्प्लेसह या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 18.9 टक्के आहे. डिस्प्लेचा रेजॉलूशन 176X208 पिक्सेल होता. नोकिया 3650 फोन Symbian 6.1 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. यात वॉइस डायल, वॉइस रिकॉर्ड सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. नोकियाचा हा फोन डॉर्क ब्लू, ग्रे आणि येल्लो कलर ऑप्शनमध्ये येतो. नोकिया 3650 मध्ये 850 mAh ची रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. 130 ग्राम वजनाच्या या फोनमध्ये 4MBचे इंटरनल स्टोरेज देण्यात आले होते.