मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – जनसुराज्या पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करुन घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil व माझ्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.@NCPspeaks pic.twitter.com/nLYQs76pJD— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) December 16, 2020
अजित पवार म्हणाले, पायाला भिंगरी बांधल्यासारखे पवारसाहेब आज काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नकारता येणार नाही. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत. काम करत असताना अनेक लोकांच्या ओळखी होत असतात. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचे काम मी पाहत आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
हसन मुश्रीफ म्हणाले, जे आज पक्षात प्रवेश करत आहेत त्यांची विविध विकासकामात करण्यासाठी त्यांना मदत करु. राजीव आवळे यांना जननसुराज्य पक्षाने तिकिट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी करुन आगोदरच राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते सध्या अपक्ष आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षाला मोठा फायदा होणार आहे. ज्यांना धमक्या देऊन भाजपात प्रवेश करुन घेतला ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. याची सुरुवात राजीव आवळे यांच्यापासून सुरु झाली असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला.