बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी (Sunil Shetty) याची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) हिनं गुरुवारी (दि 5 नोव्हेंबर रोजी) तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटर केएल राहुल (K. L. Rahul) यानं हा वाढदिवस आणखीच खास बनवला. राहुलनं अनोख्या अंदाजात तिला शुभेछा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CHNaFkmg4CE/?utm_source=ig_embed
राहुलनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात अथिया राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसत आहे. या फोटोला राहुलनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये राहुल म्हणतो, हॅप्पी बर्थडे मॅड चाईल्ड असं म्हणत त्यानं अथियाला बर्थडे विश केलं आहे. राहुलची ही खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
राहुलच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहत्यांनीही अथियाला बर्थडे विश केलं आहे. काहींना या जोडीबद्दलही कमेंट्स केल्या आहेत.
अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हिरो या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2015 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. अथिया काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत मोतीचूर चकनाचूर सिनेमात दिसली होती. हा सिनेमा खास काही चालला नाही. तिनं मुबारकां, नवाबजादे या सिनेमातही काम केलं आहे.