बहुजननामा ऑनलाइन टीम – चीनच्या वुहानमधून आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धूमाकूळ घातला आहे. असे असतानाच चीनमध्ये आणखी एक व्हायस समोर आले आहे. ब्रुसेलोसिस व्हायरस(Brucellosis) नावाच्या झुनोटीक बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे चीनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते हा विषाणू संक्रमित प्राणी, दुग्धजन्य पदार्थ, हवेच्या थेट संपर्कातून पसरतो. या विषाणुची लक्षणे फ्लूसारखीच आहेत.
चीनच्या ग्रासू प्रांताची राजधानी असलेल्या लान्झोऊच्या आरोग्य विभागाने या वृत्ताला दुजोराा दिला आहे की, ब्रुसेलोसिस व्हायरसमुळे 6 हजारापेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत. सरकारने 55 हजार 725 लोकांची चाचणी घेतली असून त्यापैकी 6 हजार 620 लोकांना या विषाणुची लागण झाली आहे. हे लोक अद्यापही सावरलेले नाहीत.14 सप्टेंबरपर्यंत या विषाणुची केवळ 3 हजार 245 प्रकरणे होती. ब्रुसेलोसिस विषाणुला माल्टा फिव्हर म्हणून ओळखले जाते. चीनमध्ये या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या वर्षी बायोफार्मास्युटिकल कंपनीत गळती झाल्याने चीनमध्ये हा विषाणू पसरला आहे.