नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनच्या गुन्हेगाराला तेथील सर्वात धोकादायक बलात्कारी म्हटले जाते. या गुन्हेगाराने दोन आठवड्यात अनेकदा बलात्कार केला. अपहरण केले शारीरिक शोषण त्याचे नाव जोसेफ मॅक्केन आहे. त्यामुळे ब्रिटनच्या सरकारने त्याला सर्वात धोकादायक रेपिस्ट म्हणले आहे.
११ वर्षांपासून ७१ वर्षांच्या महिलांवर केला आहे बलात्कार –
३४ वर्षाचा हा गुन्हेगार एक सराईत चोर आहे, परंतू एकदा तो तुरुंगातून बाहेर आला. यानंतर त्याने एप्रिलमध्ये ११ बलात्कार केले. पीडित महिलांमध्ये ११ वर्षांपासून ७१ वर्षापर्यंतच्या माहिलांचा समावेश आहे. न्यायालयाने या गुन्हेगाराला ३३ वेळा आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. जोसेफवर ३७ बलात्कार, शारीरिक शोषण, अपहरण केल्याचा आरोप आहे. न्यायालयात न्यायाधीशांनी सांगितले की जोसेफने कितीही चांगले वर्तन तुरुंगात केले तरी त्याला कमीत कमी ३० वर्षांपर्यंत तुरुंगात राहावे लागेल.
पोलिसांनी चूकून सोडले होते जोसेफला –
पोलीस प्रमुख इंस्पेक्टर कॅथरीन गुडविन यांनी सांगितले की पोलीस विभागाकडून या वर्षी फेब्रवारीमध्ये चूकून जोसेफला पेरोलवर सोडले होते. तेव्हा तो चोरीच्या गुन्हात तुरुंगात तीन वर्ष शिक्षा भोगत होता. परंतू तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांने अनेक बलात्कार केले.
ब्रिटनमध्ये तीन मुलींवर हल्ला –
पोलिसांना तपासात समजले की जोसेफने ब्रिटनच्या वॅटफोर्ड, लंडन आणि नॉर्थवेस्टमध्ये मुली आणि महिलांना लैंगिक शिकार बनवले आहे.न्यायालयात जोसेफला मानसिक रुपात रुग्ण आणि हिंसक रेपिस्ट सांगितले.
Visit : bahujannama.com