बहुजननामा ऑनलाईन टीम : भारतीय टेलिकॉम जगतात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. जिओने दूरसंचार जगात पाऊल ठेवल्यापासून इतर टेलिकॉम कंपन्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त ऑफर उपलब्ध करून दिल्या. ज्यामुळे इतर कंपन्यांनादेखील स्वस्त ऑफर देण्यास भाग पाडले गेले, ज्यामुळे कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता अलीकडेच जिओच्या ९९ रुपयांच्या ऑफरची जोरदार चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये ३६५ दिवसांसाठी सर्व सुविधा विनामूल्य आहे.
जिओने ऑनलाईन पेमेंट वॉलेट पेटीएमच्या भागीदारीत ही ऑफर सुरु केली असून पहिल्या रिचार्जवर १५०० रुपयांचा कॅशबॅक आणि १०० रुपयांचे इन्स्टंट कॅशबॅक ऑफर केले जात आहे. जर आपण जिओमध्ये पहिल्यांदा पेटीएमद्वारे रिचार्ज करत असाल. तर आपल्याला १६९९ रुपयांच्या ऑफरवर १५०० रुपये कॅशबॅक कूपन व्हाउचर आणि १०० रुपये इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच, जिओच्या ३६५ दिवसांच्या ऑफरची किंमत फक्त ९९ रुपये असणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हि फार उत्तम संधी आहे.
Visit : bahujannama.com