हैदराबाद : बहुजननामा ऑनलाइन – पब्लिक सेक्टर कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL ) च्या ३३ वर्षीय महिला अकाउंटंटने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये उच्चपदस्थ अधिकारी व इतर सहा साथीदारांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. तिचा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे , त्याच्या पत्नीला अधिकारी आणि सहकाऱ्यांनी आत्महत्येसाठी भाग पाडले. तिच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ‘भेल ‘उप महाव्यवस्थापक आणि इतर सहा कर्मचार्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
भोपाळ येथील रहिवासी नेहा चोक्सी हैदराबाद मधील BHEL येथे अकाउंट्स म्हणून कार्यरत होती. इंस्पेक्टर व्यंकटेश शामला यांनी सांगितले की, नेहाने गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बेडरूममध्ये स्वत: ला बंद केले. बऱ्याच वेळ झाल्यानंतरही ती बाहेर न आल्याने तिच्या नवऱ्याने खोलीचा दरवाजा तोडला. आत नेहाने सीलिंगच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये नेहाने BHEL चे डीजीएम रँक अधिकारी आणि त्याच्या साथीदारांवर फोन हॅकिंग करून त्रास देणे, अश्लील कमेंट करणे, तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. तिचा मोबाइल फोन हॅक होत असल्याचे नेहाने तिच्या सुसाईड नोटमध्ये सांगितले. त्याचे सर्व कॉल टॅप केले जात होते. ते लोक तिची हेरगिरी करीत होते. अधिकाऱ्याने तिच्यावर अश्लील टीका केल्याचा आरोपही या चिठ्ठीत करण्यात आला आहे.
लग्नानंतर नेहाने आपल्या पतीबरोबर राहण्यासाठी भोपाळहून हैदराबाद येथे बदली केली. हैदराबाद BHEL येथे कार्यरत डीजीएम फायनान्सचे आर्थर किशोर कुमार यांनी गेल्या दोन महिन्यांत तिला खूप त्रास दिला. आर्थरने नेहाचा फोनही हॅक केला होता. आर्थर किशोर कुमार व्यतिरिक्त नेहाने सुसाईड नोटमध्ये मोहनलाल सोनी, तीर्थवंती स्वेन, सीताराम पेंटाकोटा आणि महेश कुमार यांच्यावरही आरोप केले आहेत. हे लोक नेहावर अश्लील कमेंट्स करत असत. नेहाने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, भेल भोपाळच्या वित्त विभागात काम करणारी कल्पना, स्वाती, नीलिमा, रुचिता आणि नेहानेही तिला मानसिक त्रास दिला. हैदराबादला बदली झाल्यानंतर या लोकांनी तिथेही त्यांची बदनामी करण्यास सुरवात केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Visit : bahujannama.com