नवी दिल्ली :वृत्तसंस्था – जस्टीस शरद अरविंद बोबडे हे भारताचे पुढील सरन्यायाधीश बनणार आहेत. 18 नोव्हेंबर रोजी ते पदाची शपथ घेणार असून 23 एप्रिल 2021 पर्यंत कार्यकाळ असणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी बोबडे यांच्या नावाची शिफारस केली असून निवृत्त होण्याच्या आधी सरन्यायाधीश या पदासाठी केंद्र सरकारकडे काही नावांची शिफारस करत असतात.
मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिस शरद अरविंद बोबडे यांचा जन्म हा 24 एप्रिल 1956 रोजी महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झाला आहे. त्यांनी नागपूरच्या महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यानंतर 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य झाले. त्यानंतर 1998 मध्ये वरिष्ठ अधिवक्ता बनले. त्यानंतर 29 मार्च 2000 मध्ये त्यांची मुंबईच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली.
2012 मध्ये मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्याधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, 2013 मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा सुप्रीम कोर्टातील कार्यकाळ हा 8 वर्षांचा असल्याने आता ते सरन्यायाधीशपदी 2021 पर्यंत राहणार आहेत.
Viist : bahujannama.com