जोधपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील बारां नगरपालिकेने आयोजित केलेल्या प्रसिद्ध डोला यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील नृत्यांचा कार्यक्रम होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी या उत्सवाला विरोध दर्शवला आहे. या उत्सवात आलेल्या लहान मुलांच्या तसेच महिलांच्या उपस्थित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे.
मात्र नागरपरिषेदेचे सभापती कमल राठोड, आयुक्त मनोज मीणा आणि महोत्सव अध्यक्ष रानू गोयल यांच्या वतीने यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दररोज हजारो नागरिक या यात्रेला भेट देत असतात. हजारो भाविक आणि श्रद्धाळू याठिकाणी येत असतात. ९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या जत्रेच्या उद्घाटन सोहळ्यात महंत लक्ष्मण दास जी आणि महंत रामदासजी यांच्यासह अनेक संत उपस्थित होते.
या प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. एकीकडे साधू आणि संत महात्म्यांच्या हस्ते या यात्रेचे उदघाटन झाले असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे अश्लील कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Visit : bahujannama.com