नवी दिल्ली : वृत्तसंस्था- आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआय न्यायालयाने तिहार जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पी चिंदबरम आता 19 स्पटेंबरपर्यंत तुरुंगात असतील. दरम्यान यावेळी चिदंबरम यांनी मात्र झेड प्लस सेक्युरिटी आणि वेगळ्या सेलची मागणी केली. इतकेच नाही तर वेगळ्या इंग्लिश टॉयलेटचीही मागणी केली. परंतु त्यांना जेल मॅन्युअलच्या योग्यतेने सुविधा मिळतील असे न्यायालयाने म्हटले आहे.
Delhi: Rouse Avenue Court sends Congress leader & former Finance Minister P Chidambaram to judicial custody till September 19 in a case being probed by CBI in INX Media case. pic.twitter.com/ULL9R8K2Qy
— ANI (@ANI) September 5, 2019
सर्वोच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांना अग्रिम जामीन देण्यास नकार दर्शवत त्यांची याचिका फेटाळली होती. दरम्यान पी चिदंबरम यांची सीबीआय कोठडी आज संपली आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, “सीबीआय माजी अर्थमंत्र्यांना ताब्यात घेऊन चौकशी करू शकते.”
P Chidambaram files application before Delhi court seeking direction to ensure safe detention while in judicial custody. He also seeks direction for jail authorities to provide adequate security to him. He also seeks direction to provide separate cell with adequate security. https://t.co/Ct7IEbFTc3
— ANI (@ANI) September 5, 2019
याआधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सीबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, त्यांना पी चिदंबरम यांची पुढील कोठडी नको आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे. कपिल सिब्बल यांनी मात्र याला विरोध केला. कारण पी चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर त्यांना तिहार जेलमध्ये जावे लागण्याची शक्यता होती. यानंतर कोर्टाने त्यांच्या 5 सप्टेंबरपर्यंत कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले होते.