बहुजननामा ऑनलाईन : एका फोटो ग्राफरने फोटो शूटच्या नावाने मॉडेलला गावामध्ये बोलावले. त्यानंतर त्याने मॉडेलसोबत लग्नाचा वादा करुन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्याची आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, गुरुग्राम पोलिस प्रवक्ते सुभाष बोकन म्हणाले की आम्ही महिला पोलिस ठाण्यात जिरो एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर हे प्रकरण संबंधित जिल्ह्यात ट्रान्सफर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सहा महिन्यापूर्वीच गोविंद नावाच्या फोटोग्राफरच्या संपर्कात आली होती. त्यानंतर आरोपीने मॉडेलला फोटोशूटचे अमिष दाखवून तिला शामली जिल्ह्यात आपल्या गावी बोलवले. मॉडेल गावात राहत होती त्यावेळी फोटोग्राफरने तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले होते.
आरोपीने मॉडेलला सांगितले होते की, तो तिच्याशी लग्न करेल. मॉडेलने सांगितले की, तिच्यासोबत अनेकदा बलात्कार केला गेला. पण अलीकडेच गोविंदने लग्नास नकार दिला. त्याने मॉडेलचे इन्टिमेट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची देखील धमकी दिली. जेव्हा मॉडेलने या गोष्टीला विरोध केला त्यानंतर आरोपीने सोशल मीडियावर अश्लील मॅसेज करण्यास सुरवात केली. यानंतर पीडितेने एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला.