नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक महाभाग असे असतात जे अल्कोहोलचे सेवन करून ऑफिसला जायलाही कमी करत नाहीत. परंतु अशांना आता ऑफिसमध्ये एन्ट्री मिळणार नाही. कारण आता एक अशी सिस्टीम तयार करण्यात आली आहे जी केवळ तुमच्या श्वासांच्या गतीवरूनच तुम्ही किती नशेत असणार हे सांगणार आहे. चेन्नईच्या रॅनको कंपनीने ही फेशिअल रेकग्निशन अटेंडस सिस्टीम बनवली आहे. यामध्ये कर्मचारी जर नशेत आढळला तर याची माहिती थेट एचआरला पाठवली जाते.
काय सांगते कंपनी ?
या सिस्टीममध्ये ब्रीथ अॅनलायजरचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय याचा रिझल्ट 100 टक्के खरा आहे असाही कंपनीने दावा केला आहे. कंपनी म्हणते की, जे लोक नशा करून येतील त्यांना सहज ओळखलं जाऊ शकतं. याशिवाय कंपनीचे सीईओ विरेंदर सांगतात की, ते आता अशा सॉफ्टवेअरवर काम करत आहेत जे नशेसोबत ड्रग्स घेणाऱ्या लोकांना पकडेल.
भारतात ड्रग्स घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये 171 पायलट्सने विमान उडवण्याआधी नशा केली होती. विशेष म्हणजे यात काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सचाही समावेश आहे. दिल्लीतील जल निगमच्या एका कर्मचाऱ्याचा अल्कोहोल घेतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. जूनमधील ही घटना असून त्याला यानंतर सस्पेंड करण्यात आले.
जर्मनीतील एक रिसर्च सांगतो की साल 2010-2017 दरम्यान भारतातील अल्कोहोल घेणाऱ्यांची संख्या 38 टक्क्यांनी वाढली. याचा परिणाम ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांवर आणि तेथील वातावरणावर पडताना दिसत आहे. त्यामुळे या सगळ्याला आळा घालण्यासाठी ही नवीन सिस्टीम खूप उपयोगी आहे असे कंपनीने म्हटले आहे.