लंडन वृत्तसंस्था : आपल्या आवडल्या खेळाडूच्या ऑटोग्राफ घेण्याच्या नादात ११ वर्षीय चिमुरडा जखमी झाला. लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सलाहचा चिमुरडा चाहता त्याच्या कार मागे धावत असताना पडला, आणि रक्तबंबाळ झाला. मोहम्मद सलाह ला ही गोष्ट समजताच त्याने कार थांबवली. त्या मुलाच्या जवळ आला आणि त्याच्यासोबत जखमी अवस्थेतच फोटो काढला. आपल्या आवडत्या खेळाडू सोबत फोटो काढण्यास मिळाल्याने जखमी असूनही त्याच्या तोंडावर हसू उमटले.
मोहम्मद सलाह हा क्लब ट्रेनिंग साठी बाहेर पडत असताना हि घटना घडली. सलाह हा कार मधून जात असताना लुईस (११) आणि त्याचा भाऊ इकास त्याला पाहण्यासाठी आणि ऑटोग्राफ साठी त्याच्या कार मागे धावू लागले. त्यावेळी लुईस एका खांबाला धडकला आणि त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले.
लुईस जखमी झाल्याचे पाहून मोहम्मद सलाह कार मधून बाहेर पडला आणि लुईस जवळ गेला आणि आपल्या या चिमुकल्या चाहत्यासोबत त्याने फोटो देखील काढला. आपल्या आवडत्या खेळाडूची सही घेण्याच्या नादात आपला मुलगा जखमी झाल्याचे , ट्विट लुईस च्या बाबांनी केलं आहे. तसेच मोहम्मद सलाह याने घडलेल्या प्रकारामुळं माफी देखील मागितली , तो खूप चांगला आहे, माझ्या मुलाकडे परत वळून पाहिल्याबद्दल मी सलाहचा आभारी आहे ! असे देखील त्यांनी सांगितले.
मोहम्मद सलाह हा सध्या इंग्लिश प्रीमिअर लीग मध्ये व्यस्त आहे. गेल्या वर्षी लिव्हरपुलला उपविजेत्या पदावर समाधान मानव लागलं होत, यंदा मात्र त्यांनी विजयी होऊन स्पर्धेची सुरुवात केली आहे.
https://twitter.com/joecooper93/status/1160246084414922753