मुंबई : वृत्तसंस्था – उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांनी ९ मार्च रोजी श्लोका मेहतासोबत लग्नगाठ बांधली होती. या लग्नाला बॉलिवूड स्टार्सनेही हजेरी लावली होती. या वेडिंग मध्ये एक मुलगी अशी होती जी सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन ठरली होती. ती म्हणजे मुकेश अंबानी यांच्या लहान मुलाची गर्लफ्रेंड राधिका मर्चेंट मीडियामध्ये राधिकाला मुकेश अंबानी यांची लहान सूनही म्हटलं जातं.
राधिका मुकेश अंबानींच्या प्रत्येक फंक्शनमध्ये दिसते. राधिकाच्या साखपुड्याच्याही अनेक बातम्या समोर आल्या आहेत. परंतू याची अधिकृत पुष्टी मात्र झालेली नाही. नुकतीच राधिका बांद्राच्या एका क्लिनीक बाहेर स्पॉट झाली. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. पेपराजींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी ती पोज देत नव्हती परंतु फोनवर बिजी दिसून आली. राधिकाचे हे फोटो सोशलवर खूपच व्हायरल होत आहेत. चाहत्यांना राधिकाचे हे फोटो खूपच भावले आहेत.
राधिका मर्चेंट उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची मुलगी आहे. तिने केदार कंसलटंट, देसाई अँड दिवानजी आणि इंडिया फर्स्ट यांसारख्या कंपनीसोबत काम केले आहे. राधिकाने आपली एक फर्मही सुरु केली आहे. २४ वर्षीय राधिकाला ट्रॅकिंग, स्विमिंग आणि रिडिंगचा छंद आहे.
https://www.instagram.com/p/BuzKRjmA9vh/
https://www.instagram.com/p/Bq4f42kAcOp/
https://www.instagram.com/p/B0pjOTElOWN/