बहुजननामा ऑनलाईन – जगातील सर्वांनाच अशी इच्छा असते की त्यांना सरकारी नोकरी मिळावी. आज आपण सर्वात मोठ्या सरकारी नोकरीबद्दल जाणून घेणार आहोत. या नोकऱ्यांमध्ये जास्त पगार दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. आपण जाणून घेऊया या ५ सरकारी नोकऱ्यांबाबत.
भारतातील या ५ उत्तम सरकारी नोकर्या आहेत-
५) शिक्षक –
शिक्षकांचा पगार हा भारताचा पाचवा सर्वोत्तम पगार मानला जातो. शिक्षक शाळेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतात. महाविद्यालयात प्राध्यापक शिकवतात. त्यांना खूप जास्त पगार असतो आणि तसेच त्यांना खूप चांगल्या सुविधा दिल्या जातात. त्यामुळे शिक्षकाची नोकरी ही चांगली नोकरी मानले जाते.
४) सरकारी बँक
बँक कर्मचारी म्हणून काम करणे देखील एक उत्तम काम मानले जाते. जर आपण मॅनेजर स्तरावर काम केले तर आपल्याला वर्षाकाठी ५ ते १० लाख रुपये मिळतील अशी ही नोकरी आहे. देशातील एक उत्तम नोकरी ही बँकिंग क्षेत्राची नोकरी मानली जाते आणि जर ती नोकरी सार्वजनिक बँकेची असेल तर त्याची मजा वेगळी आहे.
३) संरक्षण
संरक्षण क्षेत्रात काम करणे ही एक चांगली नोकरी मानली जाते, आपल्याला संरक्षण क्षेत्रात खूप पगार मिळतो. संरक्षण क्षेत्रातील अधिकारी दरमहा ५० ते ६० हजार रुपये मिळवतात. संरक्षण क्षेत्रातील नोकरी आपल्याला आदर तसेच चांगला पगार आणि सुविधा देते.
२) पब्लिक सेक्टर यूनिट (PSU)
ही नोकरी भारतातील दुसर्या क्रमांकाची नोकरी मानली जाते. या नोकरीत चांगल्या पगारासह अनेक सुविधादेखील दिल्या जातात. कोल इंडिया लिमिटेड किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसारख्या सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी करणे हा एक उत्तम पर्याय आहे. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार कोल इंडिया आपल्या कर्मचार्यांना वर्षाकाठी १० ते ८ लाख रुपयांचे पॅकेज देते.
१) इंडियन एडमिस्ट्रेशन सर्व्हिस (IAS)
भारतीय प्रशासन सेवा ही भारतातील सर्वात चांगली नोकरी मानली जाते. आयएएस अधिकाऱ्याला चांगला पगार तसेच चांगली सुविधा दिली जाते. त्यामुळे ही नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.