बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या सोशल मीडियावर एक फोटोशूट मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. कारण यात कोणत्याही धर्माची किंवा लिंगाची सीमा नाही. न्यूयॉर्क मधील एक समलैंगिक जोडीचा फोटोशूट सोशल मीडियावर धूम ठोकून आहे. याला नागरिकांची पसंदीही मिळत आहे. फोटोग्राफरने सोमवारी आपल्या ट्विटर अकाउंट वरून हे फोटो पोस्ट केले आहे.
फोटो मध्ये एका छत्रीखाली दोन हसरे चेहरे दिसत आहेत. लोकांनी या जोडी सोबतच फोटोशूटलाही पसंद केले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या फोटो मध्ये दिसणाऱ्या दोन मुलींमधील एक मुलगी ही भारतातील आहे तर दुसरी पाकिस्तानातील आहे. फोटोमधील भारतातील अंजली आणि पाकिस्तानातील सुंदास मलिक हे पावसाच्या पाण्यानी भरलेल्या छत्री खाली दिसत आहेत.
या फोटोमध्ये जोडीनी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला आहे. आणि त्याच सोबत दागिनेही घातले आहे. इन्स्टाग्रावर देखील हे दोघे नेहमी फोटो शेअर करत असतात. या फोटोना शेअर करत फोटोग्राफरने कॅप्शन मध्ये लिहिले आहे, ”ए न्यू यॉर्क लव स्टोरी”. या फोटोला सध्या ४१,००० लोकांनी लाइक केले आहे. तर हजारो लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर सध्या लोकांना ही लव स्टोरी आवडत आहे.
सरोवर अहमद असे या फोटोग्राफरचे नाव आहे. या फोटोग्राफरने दोघांना अनिव्हर्सरीची शुभेच्छा देत आणखीन काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंना अंजलीनेही शेअर केला. या फोटोना शेअर करत अंजली ने सुंदर कॅप्शनही लिहिले, “त्या मुलीला अनिव्हर्सरीची शुभेच्छा जिने मला प्रेम करायला आणि प्रेम द्यायला शिकवले आहे.