नवी दिल्ली वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या आईने लिहिलेले पत्र न मिळाल्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. १२ जूलै रोजी लिहिलेले पत्र अद्याप न मिळाले नसल्याने रजिस्ट्रार यांना याचा जाब विचारला आहे. तर सेक्रेटरी जनरल यांना याप्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश देत एक आठवड्यात याप्रकरणाच्या तपासासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याप्रकरणी सेक्रेटरी जनरल यांनी याप्रकरणात स्थनिक पोलीस आणि जिल्हा न्यायाधीश यांची मदत घ्यावी आणि एक आठवड्यात अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या आईने यापुर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिले होते. आरोपी आमदार आणि त्याचे साथीदार पिडीतेच्या कुटुंबियांना सतत धमकावत आहे. तसेच याप्रकरणात पिडीत तरुणी व तिच्या कुटुंबियांना आरोपींनी समेट न करता जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिली होती. असे त्यांनी १२ जूलै रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. त्या पत्रात पिडीतेच्या कुटुंबियांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.
पिडितेच्या आईने लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, ७ जूलै २०१९ रोजी आरोपी शशी सिंह याचा मुलगा नवीन सिंह, आमदार कुलदिप सेंगरचा भाऊ मनोज सिंह सेंगर, कुन्नू मिश्रा आणि २ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरी येऊन धमकावले होते. या पत्राची दखल घेत न्यायमुर्ती रंजन गोगोई यांनी सेक्रेटरी जनरल यांना पिडीतेच्या आईने लिहिलेले पत्र न्यायालयासमोर का सादर केले गेले नाही. याचे स्पष्टिकरणही मागितले आहे.
Supreme Court asks the Secretary General to explain why the letter (dated July 12) sent by the Unnao rape victim was not placed before the court. Medical report of the victim was also sought. Chief Justice of India (CJI) was to hear the Unnao case tomorrow. pic.twitter.com/gj3k5oTglK
— ANI (@ANI) July 31, 2019