पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Supriya Sule | शिवसेनेच्या सध्या बंडखोरांना खरडपट्टी काढण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यात आघाडीवर आहेत. आता तर शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने सुद्धा बंडखोर आमदारांना सुनावले आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची (Shinde Fadnavis Government) जोरदार हजेरी घेतली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील प्रति पंढरपूर मंदिराला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मित्र पक्ष म्हणून आम्ही शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली आहे आणि यापुढेही देत राहणार. शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण हे बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच ठरवले होते आणि बाळासाहेबांच्या आदेशाच्या वेगळे काही करणे हे बाळासाहेबांना दुखावण्याचे काम आहे, असे म्हणत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. (Supriya Sule)
सरकार एका विमानातून उतरत आहे आणि दुसर्या विमानात बसत आहे फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजार रुपयांची दाढी करत आहे, अडीच हजार रुपयाची कटिंग करत आहे.
यातून सामान्य कष्टकरी आणि शेतकरी भरडतोय. हे आत्ताच सरकार सत्ता आणि पैशाच्या जीवावर आलेल आहे.
या सरकारचे सर्वसामान्य माणसांवर प्रेम नाही, हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, मी विठ्ठलाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी आले आहे.
हे सरकार अस्थिर आहे हे अजितदादा म्हणत आहेत ते खरे आहे. ज्या पद्धतीने हे लोक सुरत, गुवाहाटी, गोवा भारत दर्शन करून आले.
ज्या रीतीने आपल्या आमदारांना बाहेर राज्यातील पोलीस हाताळत होते, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
हे जे काही होत आहे ते महाराष्ट्राच्या समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या हिताचे नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Supriya Sule | ncp mp supriya sule criticizes shinde fadnavis government in pune
हे देखील वाचा :
Sanjay Raut | औरंगाबादच्या नामांतराला शरद पवारांचा विरोध नाही – शिवसेना खासदार संजय राऊत
Pimpri Chinchwad Police | चाकण जवळ टेम्पोतून १ कोटींचा गुटखा हस्तगत