मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Multibagger Stocks Tata Group Titan | तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर बाजारातून (Stock Market) कोट्याधीश होऊ शकता. शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूकदारांसाठी (Investors) ‘खरेदी करा, वाट पहा आणि विसरा’ या धोरणाचा अवलंब करण्याशिवाय श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यामुळे एखाद्याने दीर्घकाळ स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण स्टॉकमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो. (Multibagger Stocks Tata Group Titan)
टाटा समूहाची कंपनी टायटनचे (TATA Titan) शेअर्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या शेअर्सने 23 वर्षात 57000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. टाटा समूहाचा हा स्टॉक (Tata Group Stock) 1 जानेवारी 1999 रोजी 4.27 रुपयांवर बंद झाला होता. मात्र 8 फेब्रुवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 2436.55 रुपयांवर पोहोचली. याचाच अर्थ या शेअरनं (Stock Market) मागील 23 वर्षाच्या कालावधीत 57,041.69 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
एवढंच नाही तर मागील 10 वर्षात या शेअरची किंमत 210.15 रुपयांवरुन 2436.55 रुपयांवर आली आहे. यादरम्यान या शेअरनं गुंतवणूकदारांना 1059.6 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. 10 फेब्रुवारी 2017 मध्ये म्हणजे 5 वर्षापूर्वी या शेअरची किंमत 432 रुपये होती. आजच्या या शेअरची तुलना केली तर कंपनीने गुंतवणूकदारांना 464.80 टक्क्यांचं रिटर्न दिलं आहे. मात्र गेल्या एका वर्षाची कामगिरी पाहिली तर हा शेअर 154.70 रुपयांवरुन 2436.55 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. या कालावधीत शेअरच्या किंमतीत 58.26 टक्क्यांची वाढ झाली आहे. (Multibagger Stocks Tata Group Titan)
प्रत्येक वर्षाच्या हिशोबानं पाहिलं तर टायटनच्या शेअर्समध्ये 3.32 टक्क्यांची घसरण झाली आहे. एका महिन्यातच हा शेअर तब्बल 8.19 टक्क्यांनी घसरला. मात्र मंगळवारी या शेअरमध्ये 1.28 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. टायटनच्या शेअर किमतीच्या पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 23 वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर आज त्या 1 लाखाचे 5.70 कोटी रुपये झाले असते.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याच्या 1 लाख रुपयांचे 11.56 लाख रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Multibagger Stock) 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 5.64 लाख झाले असते. तसेच एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती आणि या कालावधीपर्यंत गुंतवणूक कायम ठवली असती तर आज त्याचे 1.58 लाख रुपये झाले असते.
Web Title :- Multibagger Stocks Tata Group Titan | tata group titan stock rs 4 reach rs 2439 investment of 1 lakh became 570 crores do you have in portfolio
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update