बहुजननामा ऑनलाइन टीम – दिवाळीत चाहत्यांना आता मनोरंजनाची चिंता अजिबात असणार नाही. कारण साेमवार (दि. 9 नोव्हेंबर) पासून 9 सिनेमे आणि वेबा सीरिज रिलीज(movies and web series) होणार आहेत.
1) अक्षय कुमारचा लक्ष्मी (Laxmii) हा सिनेमा म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. कंचना या तमिळ सिनेमाचा हा रिमेक आहे.
2) बॉबी देओल स्टारर आश्रम 2 (Ashram 2) ही सीरिज येत्या 11 तारखेला एमएक्स प्लेअरवर रिलीज होणार आहे.
3) अभिषेक बच्चन स्टारर लुडो (Ludo) हा सिनेमा येत्या 11 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
4) मम भाई (Mum Bhai) ही सीरिज अल्ट बालाजी, झी 5 वर 12 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.
5) दिलजीत दोसांझ, मनोज वाजपेयी, फातिमा सना शेख स्टारर सूरज पे मंगल (Suraj Pe Mangal Bhari) भारी हा सिनेमा 13 तारखेला सिनेमा हॉलमध्ये रिलीज होणार आहे.
6) राजकुमार राव व नुसरत भरूचा यांचा छलांग (Chalaang) हा सिनेमा 13 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.
7) दिव्येंदू शर्मा स्टारर बिच्छू (Bichhu) ही सीरिज येत्या 18 नोव्हेंबर रोजी झी 5 वर रिलीज होणार आहे.
8) अनुप सोनी व पाऊली दाम यांची रात बाकी है (Raat Baaki Hai) ही सीरिज झी 5 वर पाहायला मिळणार आहे.
9) राजीव खंडेलवालची नक्सलबाडी (Naxalbari) ही सीरिज 28 नोव्हेंबर रोजी झी 5 वर रिलीज होत आहे.