बहुजननामा ऑनलाईन – भारतात नरेंद्र मोदी सरकार सैन्याची ताकद वेगाने वाढत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीमध्ये ५० दिवसांच्या आत भारतीय सैन्याने ८५०० कोटींचे हत्यार खरेदी केले आहे. सरकार सुत्रांच्या माहितीनूसार, सैन्याला अपग्रेड करण्यासाठी संरक्षणाचे प्लॅनिंग अद्याप गुलदस्त्यात आहे. जे लवकरच आपल्याला कळेल. बालाकोट एअरस्ट्राइकनंतर सैन्याला अनेक हत्याराची गरज होती. पुलवामा आतंकी हमल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने सैन्याला सीमांच्या सुरक्षतेसाठी गरजेचे हत्यार खरेदी करण्याचा अधिकार दिला होता. यानंतर सैन्याने एका मागे एक संरक्षाणाचे प्लॅनिंग केले.
सैन्याने ५० दिवसांमध्ये जे महत्वाचे संरक्षण हत्यार खरेदी केले त्यामध्ये स्पाइक एंटी-टॅक गाइडेड मिसाइल, आर-७३ आणि आर- ७७ एअर टू एअर मिसाइल, स्पाइस २००० एअर टू ग्राउंड स्टॅंड ऑफ हत्यारसोबत एक्सेलिबुर गाइडेड दारु गोळा सामील आहे. सैन्याच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मागील काही दिवसांमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याच्या अधिराऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये सैन्याला अपग्रेड करण्यासाठी तेजीने पाऊल उचलण्यास सांगितले होते. यानंतर तेजीने संरक्षणाचे प्लॅनिंग केले जात होते. भविष्यामध्ये अनेक संरक्षक हत्यार खरेदी केले जाऊ शकतात.
याव्यतिरिक्त मोदी सरकारने भारतीय वायुसेनेसाठी ११४ मल्टीरोल लढाऊ विमान खरेदी करण्याचा विचार करणे चालू आहे. जवळजवळ १५ मिलियन डॉलरच्या या संरक्षण खरेदीसाठी अमेरिकेच्या बोइंग आणि लॉकहीड मार्टिन, स्वीडनची साब, फ्रांन्सची दसॉल्ट समेवत अनेक जागतिक संरक्षण कंपनीने दावे केले आहे. भारतीय वायुसेनामध्ये मिग-२१ विमान जुने झाले आहे. अनेकवेळा मिग-२१ विमानाचा अपघात झाला आहे. त्यामुळे ‘फ्लाइंग कॉफिन’ बनलेल्या मिग-२१ ला बदलण्यासाठी ११४ मल्टिरोल लडाऊ विमान खरेदी करण्याची योजना करत आहे.