बहुजननामा ऑनलाईन टीम – 83 Movie Promotion | बॉलिवूडमधील आगामी चित्रपट ’83 (83 Movie)’ बद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारतानं (India WorldCup 1983) ऐतिहासिक विजय मिळवला होता, त्या सुवर्णक्षणांचा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांनी हा चित्रपट उत्तमरित्या दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंहनी (Ranveer Singh) मुख्य भूमिका साकारली असून, या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणवीर सिंह चित्रपटाबद्दल बोलत असताना हळवा झाला आणि डोळ्यातून अश्रू आले. (83 Movie Promotion)
रणवीर सिहं एका मुलाखतीमध्ये चित्रपटाबद्दल बोलत असताना भावूक झाला. त्याच्या सोबतच चित्रपटाची टीम देखील होती. चित्रपटाच्या (83 Movie) टीम सोबतच खरीखुरी टीमच्यादेखील डोळ्यात अश्रू आले. या मुलाखतीमध्ये रणवीर सोबतच कपिल देव (Kapil Dev), सुनील गावस्कर (Sunil Gavaskar), सैयद किरमानी (Syed Kirmani), के श्रीकांत (K srikanth), कीर्ति आजाद (Kirti Azad) आणि संदीप पाटील (Sandip Patil) यांसारखे दिग्गज लेजेंड्स उपस्थित होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चित्रपटाबद्दल बोलत असताना रणवीर सिंह म्हणाला, आम्हाला सगळ्यांना या चित्रपटाचा हिस्सा बननं एक अदभूत गोष्ट आहे. कबीर खान म्हणाले याबद्दल बोलायला माझ्याकडे कोणता शब्द नाही. रणवीर सिंहग हळवा झाला आणि डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याचा सोबत कपिल देव, सैयद किरमानी, कीर्ती आदाज यांचे देखील डोळ्यात अश्रू आले. (83 Movie Promotion)
दरम्यान, रणवीर सिंहचा बहुचर्चित ’83 (83 Movie)’ 24डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, सोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. रणवीरनं चित्रपटामध्ये कपिलदेव यांची भूमिका साकारली असून, दीपिकानं त्यांची बायको रोमी भाटियीचं (Romi Bhatia) पात्र साकारलं आहे.
Web Title :- 83 Movie Promotion | ranveer singh breaks down during film 83 promotion know reason
Multibagger Stock | काही महिन्यात 1 लाख रुपयांचे झाले 20 लाख, गुंतवणुकदार झाले मालामाल