कुर्डूवाडी : बहुजननामा ऑनलाईन – सकल मराठा सोयरीक व मराठा क्रांती मोर्चा माढाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळाव्यात ८१० जणांची नोंदणी करण्यात आली. येथील संकेत मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात २२० विवाहेछुक नववधू व ५९० नववर असे एकुण ८१० वधू- वरांनी सहभाग नोंदवला. सुनिल जवंजाळ पाटील, डॉ. राजेंद्र दास यांनी मार्गदर्शन केले. सुलभा गोरे, जयश्री बागल, रेश्मा कन्हेरे, मोहिनी पाटिल, सुवर्णा थोरात, शितल सुरवसे, सुलभा दास, सुवर्णा पाटील, प्रसिध्दी पाटील, सुनिता पाटील, भाग्यश्री गोरे आधी उपस्थित होत्या.
मेळाव्यासाठी जोतिराम गोरे, संजय टोणपे, रावसाहेब पाटील, नागेश बागल, तानाजी काटे, हर्षल बागल, पंकज पिंगळे, रवि सुरवसे, इंजि. अजित पवार, संजय घाटणेकर, संजय गोरे, महादेव थोरात, नागेश लोंढे, सतिश कन्हेरे, महादेव फासे, शरद भोसले, रवि सुरवसे, दिलीप ऊकरंडे, वसंत शिलारे, रवि शेडंगे, अजित परबत, राजेंद्र गव्हाणे, मनोज गोरे, संजय गोरे, हरि बागल, सतीश कन्हेरे आदींनी परिश्रम घेतले.