बहुजननामा ऑनलाइन टीम – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या २ पथकांनी (raids in Bhusawal)एकाच वेळी ५ सट्टा अड्ड्यांवर छापे घातले असून त्यात ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णा महालेकर, संदीप अशोक चौधरी, रवींद्र रामदास वारके, संतोषलाल गिरीलाल, गोपाल द्वारकादास अग्रवाल, प्रल्हाद हरी सपकाळे, छोटेलाल ब्रिजलाल, संतोष शंकर तायडे, मारोती वेडू भालेराव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नाहटा चौफुलीजवळील दीनदयालनगर, अष्टभूजा देवी मंदिर परिसर, कंजरवाडा आठवडे बाजार, सोनिच्छावाडी येथे दोन अशा ५ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यात सट्टा घेणार्या ९ जणांना अटक केली असून त्या ठिकाणाहून ४८ हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.