आग्रा : वृत्तसंस्था – ताजगंज मधील बसईच्या एका घरात देह विक्रीचा व्यापार सुरु होता. स्थानिकांसोबतच राजस्थानमधील अनेक तरुणी यात सहभागी होत्या. रविवारी पोलिसांनी आणि एका एनजीओने छापा मारत या घरातून 13 तरुणी, दोन संचालिका आणि तीन ग्राहकांना अटक केली. सदर सर्वांविरोधात खटला दाखल करण्यात आला.
फ्रीडम फर्म संस्थेने पोलिसांना सूचना दिली होती की, बसईच्या घरात तरुणींना कैद करत जबरदस्ती वैश्या व्यवसाय चालवला जातो. सीओ सदर विकास जायसवाल यांनी पोलीस फोर्स सोबत सायंकाळी चार वाजता बसईच्या घरी छापा टाकला. आठ रुमच्या घरात काही तरुण तरुणी होते. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे. घरात एकूण 13 तरुणी होत्या यातील काही राजस्थानच्या धौलपूर, मनियां आणि बुंदीमधील होत्या. तर काही स्थानिक होत्या. घरात ग्राहक म्हणून आलेल्या 3 तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ताजगंज पोलीस ठाण्यात सर्वांची चौकशी सुरु आहे.
तरुणींनी सांगितले की, त्या आपल्या मर्जीने इथे रहात आहेत. सर्व आपल्या मजबुरीने यात फसल्या होत्या. दोन संचालिकांपैकी एक मुंबईत रहाते तर दुसरी इथे राहण्याची सोय करणे. गेल्या एका महिन्यापासून हा धंदा सुरु होता.
संचालिका घेत होत्या कमिशन
तरुणींनी चौकशी खुलासा केला की, दिवसातून कमिशन म्हणून 15 रुपये संचालिका घेत होत्या. उर्वरीत पैसे तरुणींना मिळायचे. खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा खर्च संचालिकाच करत होत्या.
अनेक ठिकाणी सुरु होता धंदा
संचालकांनी सांगितले की, देह विक्रीचा धंदा इतर ठिकाणीही सुरु आहे. त्यालाही पोलिसांनी बंद करावं. सर्वांना ते माहीतही आहे.