बहुजननामा ऑनलाईन – एक १२ वर्षाची निरागस मुलगी ही आपल्या आजीसोबत यात्रा पाहायला गेली आहे. परंतु ती त्या यात्रेतून गायब झाली. मात्रदुसऱ्या दिवशी त्या मुलीचा यात्रेच्या जवळच ५० मीटर अंतरावर त्या निष्पाप मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला. या मुलीचा कुत्र्याच्या मदतीने शोध घेतला. तेव्हा तिची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बिहारच्या अररिया जिल्हयात उघडकीस आली आहे. ही हत्या करणारा एक आरोपी पकडला गेला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रिया नावाची ही १२ वर्षांची मुलगी अररिया जिल्ह्यातील मिर्जापूर येथे आपल्या आजोळी राहत होती. सोमवारी रात्री प्रिया आपल्या आजीसोबत जत्रेत डान्स पाहायला गेली होती आणि तेथून ती गायब झाली. तिच्या आजीने तिची खूप चौकशी करूनही ती मुलगी सापडली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी जत्रेपासून जवळच ५० मीटर अंतरावर तिचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला.
या निष्पाप मुलीवर काही नराधमांनी या मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. यातील एका नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस याप्रकरणात सामील असलेल्या बाकी आरोपींचा शोध घेत आहे.