बहुजननामा ऑनलाईन
रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. गॅस, एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या वारंवार झाल्यास त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने अशा अनेक समस्या दूर राहतात. जाणून घेवूयात याचे फायदे…
हे आहेत फायदे
1 मेंदू
यातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. मुलांना सकाळी शेंगदाणे खायला द्या.
2 हृदयरोग
एका रिसर्चनुसार शेंगदाण्यांमध्ये कार्डियोप्रोटेक्टिव्ह गुण असल्याने हृदयाचे आजार दूर राहतात.
3 व्यायाम
सकाळी उठून शेंगदाण्यांचे सेवन केल्याने व्यायाम करताना जास्त स्ट्रेंन्थ वापरू शकता. शेंगदाणे पाण्यात भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते.
4 पोट साफ
भिजवलेल्या शेंगदाण्याच्या सेवनाने गॅस, पोट साफ न होण्याची समस्या दूर होते. पोट साफ होते.