नवी दिल्ली : वृत्तसंस्था –आगामी निवडणुकांची तयारी सर्वत्र सुरु झाली आहे, दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्यात युती झाली आहे. दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात ‘भाजपावाल्यांना पळवून पळवून मारणार’ असे वक्तव्य बहुजन समाज पार्टी चे नेते विजय यादव यांनी केली.
काही दिवसांपूर्वीच बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा आणि समाजवादी पार्टी चे नेते अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीत आघाडी झाल्याची घोषणा केली आहे. दरम्यान बसपा प्रमुख मायावती यांच्या वाढदिवस साजरा करण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बसपा नेते विजय यादव यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भाजपा , काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी केवळ उद्योगपतींसाठीच काम केले आहे. गरीबांसाठी काहीच केले नाही. आगामी काळात निवडणुका होणार आहेत. अजून लढाई बाकी आहे. त्यामुळे घाबरू नका. या भारतीय जनता पार्टीवाल्यांना पळवून पळवून मारणार. असे वक्तव्य त्यांनी केले. इतकेच नव्हे तर आता भाजपाला आपली मेलेली आजी आठवेल. असेही ते म्हटले.
विशेष म्हणजे याच्यावरच ते न थांबता त्यांनी काँग्रेसवरही जोरदार प्रहार केला. काँग्रेस पार्टीने आपल्याला चार गांधी दिले…इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. आणि भाजपाने काय दिले, तर नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानीच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी. असेही ते म्हटले. याचबरोबर सपा-बसपा एकत्र झाले आहेत. सपा-बसपाला एकाच व्यासपीठावर पाहून सर्वजण बेशुद्ध होतील. असेही ते म्हटले.
दरम्यान, जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय भीम’च्या घोषणा देत भाजपा आणि काँग्रेसविरोधात जोरदार नारेबाजी केली.