नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन –जनता कांग्रेसचे नेते अजीत जोगी यांनी छत्तीसगढ़ विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी सोबत उडी मारली आहे. यादरम्यान निवडणुकीत कोणत्यापन पक्षाला बहुमत मिळाले नाही तर ते भारतीय जनता पार्टी सोबत हात मिळवणी करू शकतात असे जनता कांग्रेसचे नेते अजीत जोगी यांनी म्हंटले आहे.
छत्तीसगढ़ विधानसभा निवडणुक मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून येत्या २० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार असून ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यादरम्यान जनता कांग्रेसचे नेते अजीत जोगी यांनी छत्तीसगढ़ विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी सोबत उडी मारली आहे. या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीने ३३ उमेदवार उभे केले आहे. तर जनता कांग्रेसचे नेते अजीत जोगी यांनी ५५ उमेदवार उभे केले आहेत.
विशेष म्हणजे मध्यप्रदेश मधून छत्तीसगढ़ वेगळे झाल्यानंतर अजीत जोगी हे छत्तीसगढ़चे पहिले मुख्यमंत्री आहेत. याचबरोबर काँग्रेस तर्फे २००० ते २००३ पर्यंत त्यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर १५ वर्षे रमन सिंह राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०१६ ला काँग्रेस सोडून त्यांनी जनता कांग्रेस हि स्वतःची पार्टीची स्थापनां केली.