लातूर : बहजननामा ऑनलाइन – जी. टी. होसूरकर यांनी कास्ट्राईब महासंघाचा कार्यकर्ता प्रामाणिक असायला हवा, तेव्हाच महासंघाला भविष्यात आणखी चांगले दिवस येतील, असे सांगितले. यू. डी. गायकवाड यांनी महासंघाद्वारे सुशिक्षित बेरोजगारांची एक विंग तयार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. भाऊसाहेब हांगेंनी विभागीय कार्यकारिणीने आजवर केलेल्या कार्याचे कौतुक केले. महासंघाचे राज्य अधिवेशन फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याने सर्वांनी तयारीस लागावे, असे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अधिवेशन आणि लातूर विभागाची आढावा बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृहावर उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष जी. टी. होसूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून महासंघाचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, राज्य उपमहासचिव भाऊसाहेब हांगे, राज्य सहसचिव यू. डी. गायकवाड उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी फुले, शाहू, आंबेडकरांच्या प्रतिमांना वंदन करण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे यांनी प्रास्ताविकात लातूर जिल्ह्यातील कास्ट्राईब महासंघाचे कार्य, अधिवेशनाची तयारी, मागासवर्गीयांचा अनुशेष, पदोन्नतीत आरक्षण, खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीयांची भरती याची माहिती दिली.विभागीय स्तरावर महासंघाने केलेल्या कार्याचा आढावा आर. पी. ढगे यांनी सादर केला. सहाय्यक गटविकास अधिकारी रामराजे आत्राम यांनी महासंघाला सतत तत्पर राहून कार्य करावे लागत असल्याचे स्पष्टीकरण देऊन महत्त्वाचे मुद्दे मांडले.
या बैठकीस महासंघाचे विभागीय कोषाध्यक्ष बी. आर. सातपुते, जिल्हा सचिव किशोर गायकवाड, विभागीय सचिव डी. एस. वाघमारे, विभागीय सहसचिव संजय डावळे, बीड जिल्हाध्यक्ष अनिल जाधवर, नांदेड जिल्हाध्यक्ष के.एच. वने, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शितोळे, भागवत सोनवणे, आदिनाथ ढाकणे, कल्याण बारवकर, बालासाहेब सिरसाट, धम्मदीप डांगे, बाळू बनसोडे, बाबूराव बनसोडे, दिलीप जाधव, डॉ. विलास गाजरे, शांतीलाल लांडगे, डी. के.सूर्यवंशी, सुधीर साबणे, अरविंद भोसले, रवी कुरील, माधव कांबळे, चंद्रकांत मोटेराव, आरती कांबळे, पंचशीला डोंबे, माधवी भालेराव, सुजित गायकवाड, विद्यासागर काळे, दीपक कांबळे, प्रा. सूर्यकांत वाकळे, बळीराम गायकवाड, शरद हणमंते, दीपक मांडवीया, संगम बोरोळे, रमेश कांबळे, रमेश मांदळे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचलन किशोर गायकवाड यांनी तर आभार अरविंद भोसले यांनी मानले.