अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतेच राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे होते. उदघाटक म्हणून वरिष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे उपस्थित होते. यावेळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. वऱ्हाड विकास व श्रीकृष्ण व्यायाम शाळेच्या संयुक्त सहकार्याने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बीजभाषण श्रीकृष्ण बनसोड त्याचबरोबर दीपक खेरडे यांनी संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. काळबांडे म्हणाले, साहित्यातून जात व धर्माच्या पलिकडे जावून विचार करण्याची गरज आहे. संमेलनाला डॉ. रजिया सुलताना, बबनराव पाटील, ओमप्रकाश अंबाडकर, विनोद बकाले, शंकर मालधुरे, प्राचार्य सुरेश देवळे, डॉ. श्रीकृष्ण गोरडे, प्रदीप लांडे, प्रा. एन. आर. होले, विजय विल्हेकर, प्राचार्य भगवान इंगळे, प्राचार्य गोपाल यावले, प्रा. गीता मडघे, अनिल राठोड, कमलाकर धोंगडे, निलीमा होले, रजनी मालखेडे, मधुकर नेरकर, समीर बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते.