सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – महात्मा फुले महामंडळात ६० व्यवसायांचा समावेश केला असून यामध्ये कर्ज वाटपात पारदर्शी कारभार करणार असल्याचे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केले. माढा येथील मेळाव्यासाठी आल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात सोलापूर लोकसभेसह चार जागा रिपाइंला सोडण्याची मागणी भाजपकडे केली आहे. शिर्डी मतदार संघात जाणीवपूर्वक ना.आठवले यांना पाडल्याची खंत व्यक्त करत इंदू मिलची मोठी जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली असल्याचे सांगून भाजपशी युती केल्याचा फायदा झाल्याचे सांगितले.
अध्यक्ष झाल्यानंतर आपण मार्जिन मनी बीज भांडवल योजनेला गती दिली. महामंडळाने स्वत:च कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाख रुपये थेट कर्ज योजना, आण्णासाहेब पाटील महामंडळाप्रमाणे पाच, दहा, पंचवीस लाखांचे कर्ज द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, चंद्रकांत वाघमारे, कुमार वाघमारे, राहुल लंकेश्वर, गंगाराम पवार, उपनगराध्यक्ष प्रभाकर जाधव, शहाजी साठे, अशोक जानराव, अशोक माने, कांचन कांबळे, अमर लंकेश्वर आदी उपस्थित होते.