नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉटेलबाहेर हातात पिस्तूल घेऊन तरुणांना पिस्तूलाचा धाक दाखवत शिवीगाळ आणि दमदाटी करत राडा घातलेल्या बहुजन समाज पार्टीच्या एका माजी खासदाराच्या मुलाला १६ दिवसांनी कोर्टाने जामीन दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बहुजन समाज पार्टीचे माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा आशीष पांडे याने हृयात हॉटेलच्या बाहेर तरुणांना पिस्तूलाचा धाक दाखवत शिवीगाळ आणि दमदाटी करत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. इतकेच नव्हे तर त्याच्यासोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचे व्हिडीओत दिसले होते. त्यासंदर्भात पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले होते. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा पटियाला हाऊस कोर्टात आशिष पांडेच्या विरोधात चार्जशीट दाखल केली होती. पटियाला हाऊस कोर्टचे न्ययाधीश धर्मेंद्र सिंह यांनी केवळ ५० हजार रुपयांचा दंड आकारून त्याला जामीन दिली आहे. इतकेच नव्हे तर त्याला ताकीदही दिली आहे. दिल्ली पोलीस ज्या वेळेस तुम्हाला चौकशी साठी बोलावेल त्यावेळेस त्यांना सहकार्य करावे.
यादरम्यान पटियाला हाऊस कोर्टात आशिष पांडे यांच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणाबद्दल पोलिसांची चौकशी झालेली आहे. त्यांच्यवर कलम ३४१ /५०६ नुसार गुन्हा आहे. या गुन्ह्यात त्यांना आता जमीन मिळू शकतो. विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा आशिष पांडे यांची जामीन रद्द करण्यात आली होती.