वर्धा : बहुजननामा ऑनलाइन – धनगर समाजाला लोकसभा निवडणुकीपुर्वी आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने आरक्षणाकरिता पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याकरिता केंद्राकडे शिफारस केली आहे. लवकरच आम्ही धनगर आरक्षण संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. निवडणुकीपुर्वीच धनगर समाजाला आरक्षण मिळेल अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धनगर समाजसेवा संस्थेच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी शिष्टमंडळात धनगर समाज सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष जितू गोरडे, रामेश्वर लांडे, विनायक नन्नोरे, कृष्णा घोडे, सतिश धवने, कवडू बुरंगे, अनुप सरोदे, विठ्ठल गराड, माणिकराव बुरांडे, किशोर ढवळे, बाबाराव उघडे, मनिष निखार, ढोकणे, सुनील उपासे आदिंची उपस्थिती होती.