बहुजननामा ऑनलाइन टीम – भद्रावती :- दि.26 -भद्रावती येथील आबंडेकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते तथा भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ देवगडे यांचे आज दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने नागपुर येथील एका खाजगी रूग्णालयात निधन झाले.
राजुभाऊ देवगडे हे मागिल अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. ते भद्रावती नगर परिषदेचे नगरसेवक राहिले होते. विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी जनतेची सेवा केली. त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे कार्यकर्ते व मिञ परिवारावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.