नवी दिल्ली : वृ्त्तसंस्था – जगात अनेक कंपन्या अशा आहेत ज्यांची व्हॅल्यू अनेक देशाच्या जीपीडपी इतकी आहे. जगात सर्वाधिक कमाई वॉलमार्ट कंपनी करते. ही कंपनी रोज 10 हजार कोटी रुपये कमावते. पाहूयात पूर्ण यादी.
1) सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपनीच्या यादीत दहाव्या नंबरवर टोयोटा आहे. गेल्या वर्षी या कंपनीने 242 अरब डॉलर कमावले होते.
2) नवव्या नंबरबाबत बोलायचे झाले तर जर्मनीची कंपनी फॉक्सवॅगन नवव्या नंबरवर आहे. मोटर व्हीकल अँड पार्ट्ससोबत जोडलेल्या या कंपनीने गेल्या वर्षी 278 अरब डॉलर कमावले आहेत.
3) आठव्या नंबरवर आहे अमेरिकन कंपनी एक्सॉन मोबिल. पेट्रोलियम रिफानरी वाल्या या कंपनीने मागील वर्षी 290 अरब डॉलर कमावले होते.
4) ब्रिटेनची कंपनी बीपी काबिज सातव्या क्रमांकावर आहे. पेट्रोलियम सेक्टरमधील या कंपनीने 304 अरब डॉलरचा बिजनेस केला होता.
5) सौदीची मायनिंग आणि क्रूड ऑईल बिजनेसशी निगडीत कंपनी अरामको सहाव्या क्रमांकावर आहे. या कंपनीने 356 अरब डॉलर कमावले आहेत.
6) पाचव्या क्रमांकावार आहे चीन. चीनी कंपनी स्टेट ग्रिडने एकूण 387 अरब डॉलर कमावले होते. एनर्जीच्या क्षेत्राशी निगडीत ही कंपनी आहे.
7) चौथ्या नंबरवर चीनची कंपनी नॅशनल पेट्रोलियम आहे. या कंपनीने गेल्या वर्षी 393 अरब डॉलर कमावले आहेत.
8) तिसऱ्या क्रमांकाबद्दल बोलायचे झाले तर, नेदरलँड्सच्या रॉयल डच शेल कंपनीचं नाव येतं. गेल्या वर्षी या कंपनीने 397 अरब डॉलर कमावले होते.
9) चीनमधील कंपनी सिनोपोक ही कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीने गेल्या वर्षी 415 अरब डॉलर कमावले होते.
10) गेल्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारी कंपनी आहे वॉलमार्ट. अमेरिकेतील वॉलमार्ट या कंपनीने गेल्यावर्षी 514 अरब डॉलर कमावले आहेत जे जगात सर्वाधिक आहे.