कढीपत्ता आणि दह्याचा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करुन घ्या. यामध्ये दोन चमचे दही घाला. ही पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने किंवा सौम्य शाम्पूने धुवा. हा हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून दोन लावल्यास कोंड्याची समस्या दूर होईल. (Winter Hair Care)
आवळा, मेथी आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी कढीपत्त्याची पानं बारीक करुन पेस्ट बनवा. यानंतर आवळा पावडर (Amla powder), मेथीची पावडर (Fenugreek powder) आणि कांद्याचा रस घाला. हे मिसळून पेस्ट बनवून ती केसांवर 30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. पण केस धुत असताना कोणत्याही शांपूचा वापर करुन नका. हा हेअर मास्क आठवड्यातून दोनदा वापरल्यानंतर तुम्हाला फरक दिसू लागेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कडुलिंबाचे तेल आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क
कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये कडुलिंबाचे तेल घाला. हे मिश्रण चांगले मिसळा आणि केसांना लावा. एक तासानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. त्यामुळे कोंड्यापासून तुमची सुटका होईल. तसेच केस चमकदार होण्यास मदत होईल.
टीप – वरील माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Web Title :- Winter Hair Care | winter skin care health care hair care tips
Banana In Winters | हिवाळ्यात केळी खाण्याचे फायदे किंवा तोटे? ‘या’ लोकांनी राहावे दूर
Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोनोरी ड्रेसमध्ये दाखवली कातिलाना फिगर, फोटोंनी लावली आग
Parineeti Chopra | परिणीती चोप्राने परिधान केला इतका टाईट ड्रेस की अचानक मागून फाटला अन्…