बहुजननामा ऑनलाइन टीम – रांची : चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव ( Lalu Yadav)अनेक महिन्यांपासून कारागृहात शिक्षा भोगत आहेत. यादरम्यान, त्यांनी कोर्टात अनेकदा जामीनासाठी अर्ज केला, पण त्यांना दिलासा मिळाला नाही. आता त्यांच्या आणखी एका जामीन अर्जावर आज शुक्रवार 11 डिसेंबरला झारखंड हायकोर्टमध्ये सुनावणी होणार आहे. याचिका स्वीकारली गेल्यानंतर लालू यादव यांचा कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होईल. राजद प्रमुख लालू यांना अनेक प्रकरणात अगोदरच जामीन मिळाला आहे.
डोरंडा कोषागारातून पैसे काढण्याचे प्रकरण
लालू यादव यांच्यावर चारा घोटाळ्याशी संबंधीत अनेक प्रकरणे दाखल आहेत. शुक्रवारी होणारी सुनावणी या घोटाळ्यातील पाचवे प्रकरण आहे. हे डोरंडा कोषागारातून अवैध प्रकारे पैसे काढण्याचे प्रकरण आहे. कोषागरातून 139 कोटी रूपये काढण्यात आले होते. लालू यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधीत तीन प्रकरणात अगोदरच जामीन मिळालेला आहे. डोरंडा कोषागारातून पैसे काढण्याच्या प्रकरणात सुनावणी आज होणार आहे.
तीन प्रकरणात जामीन
लालू यादव यांना ज्या चार प्रकरणात शिक्षा मिळाली आहे, त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात अपील केले आहे. यापैकी तीन प्रकरणांत त्यांना जामीन देण्यात आलेला आहे. लालू यादव यांना सर्व प्रकरणात निम्मी शिक्षा भोगल्याच्या आधारावर जामीन देण्यात आला आहे. दुमका कोषागार प्रकरणात सुद्धा त्यांनी याच आधारावर जामीन मागितला होता. सोबतच आपल्या आजाराचा संदर्भ दिला होता.
सीबीआयचा विरोध
तपास एजन्सी सीबीआय सुरूवातीपासूनच लालू यादव यांना जामीन देण्यास विरोध करत आहे. मात्र, लालू यादव विविध आधारावर जामीन मागत आहेत. राजद प्रमुखांची प्रकृती ठीक नसते. या कारणामुळे त्यांचा जास्तवेळ रिम्स हॉस्पीटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली जात आहे.