नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. जगभरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनावर लस तयार करण्यात जगभरातील अनेक देशातील संशोधक प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कोरोना लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीबाबत दावे केले आहेत. मात्र, आता पहिल्यांदाच जागतिक आरोग्य संघटनेने लस कधी उपलब्ध होणार याबाबत माहिती दिली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठीची लस कधी येणार याकडे जभरातील प्रत्येकाचे डोळे लागून राहिले आहेत. जगभरात शेकडो कोरोना लशींवर काम सुरु आहे. यापैकी काही लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत, त्यापैकी मोजक्याच लशींचं क्लिनिकल ट्रायलचा शेवटचा टप्पा सुरु आहे. या लशी तयार करणाऱ्या कंपन्यांनी आपली लस बाजारात कधी उपलब्ध होणार याबाबत दावे केले आहेत. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत मोठी माहिती दिली आहे.
काही लशी आता क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत आणि या लशी सुरक्षित आणि परिणामकारक असतील अशी आम्हाला आशा आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. तसेच 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला कोरोनाविरोधात प्रभावी अशी लस उपलब्ध होईल, असेही संघटनेनं म्हटलं आहे. ही लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वात आगोदर जगभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यानंतर 65 वर्षावरील वयाच्या व्यक्तींना आणि ज्यांना इतर आजार आहेत अशा लोकांना प्राधान्य दिले जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.