नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यातच WhatsApp, Facebook, Twitter आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा युजर्सही मोठा आहे. WhatsApp च्या युजर्सची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी नवंनवे फिचर्स आणण्याचा प्रयत्न असतो. त्यानंतर आता WhatsApp एक नवं फिचर आणण्याच्या तयारीत आहे.
WhatsApp कडून आता लवकरच एक नवीन फिचर येणार आहे. या व्हॉईस मेसेजच्या प्लेबॅक स्पीड फिचरवर टेस्टिंग सुरू आहे. Voice Messages Playback Speed Feature या नवीन फिचरच्या माध्यमातून युजरला कोणताही Voice Message वेगाने किंवा कमी स्पीडने ऐकता येणार आहे. या फीचरअंतर्गत युजर्स कोणत्याही Voice Message साठी तीन विविध स्पीड निवडू शकतो. यासाठी ऑडिओ प्लेबॅक स्पीड लेव्हल 1x, 1.5x आणि 2x असे तीन पर्याय मिळतील.
आत्तापर्यंत WhatsApp वरून Voice Message रेकॉर्ड होताच आपोआप Send केला जात असे. मात्र, आता असा मेसेज Send करण्यापूर्वी युजरला Review करता येणार आहे. सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यावर लवकरच कंपनीकडून Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी हे फिचर रोलआउट केले जाईल.