नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये पश्चिम बंगालचे योगदान सर्वात जास्त आहे. स्मॉल सेव्हिंग स्कीम्स म्हणजे राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) आणि भविष्य निधी (पीपीएफ) मध्ये पश्चिम बंगालचे योगदान सुमारे 90 हजार कोटी रुपयांचे आहे, जे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये सर्वात जास्त आहे. या योजनांमध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या एकुण योगदानामध्ये पश्चिम बंगालचा भाग सुमारे 15 टक्के आहे.
दुसर्या स्थानावर युपी
लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश या योजनांमध्ये 69,660.70 कोटी रुपयांच्या योगदानासह दुसर्या स्थानावर आहे. अर्थ मंत्रालयानुसार राष्ट्रीय बचत संस्थेद्वारे 2017-18 मध्ये जमवण्यात आलेल्या आकड्यांनुसार या योजनांमध्ये सर्व राज्य आणि संघ शासित प्रदेशांचे योगदान 5.96 लाख कोटी रुपये आहे. शेवटचे 2017-18 मध्ये हे आकडे अपडेट करण्यात आले होते.
व्याजदर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला
सरकारने गुरुवारी स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवर व्याजात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. एक दिवसापूर्वीच व्याजदरात कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नंतर हा निर्णय दुसर्याच दिवशी मागे घेण्यात आला.
अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक प्रकरणांच्या विभागांतर्गत येणार्या राष्ट्रीय बचत संस्थेच्या आकड्यांनुसार पश्चिम बंगाल स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये कलेक्शनमध्ये सर्वात पुढे आहे. मागील काही वर्षापासून या योजनांमध्ये राज्याचे योगदान 12 ते 15 टक्केच्या दरम्यान कायम आहे. ज्या अन्य राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्यामध्ये आसामचा स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये भाग 9,446.37 कोटी रुपये, केरळचा 14,763.01 कोटी रुपये, पुदुचेरीचा 1,082.40 कोटी रुपयांचा, तमिळनाडुचा 28,598.18 कोटी रुपयांचा आहे.