वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – Wardha Crime News | ज्यांच्याकडे न्याय मागायला गेली त्याच ठाणेदाराने तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्याचे (Hinganghat Police Station) तत्कालीन ठाणेदार (Police Inspector) संपत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल (Wardha Crime News) करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत एका 24 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार तत्कालीन ठाणेदार संपत पोपट चव्हाण (Sampat Papat Chavan) याच्याविरुद्ध आयपीसी 376 (2) 376 (1)376 एन (2),506 या विविध कलमान्वये 6 मार्च 2023 ला गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने पाच पानी तक्ररीत नमूद केले आहे की, ती 5 ऑगस्ट 2021 रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात आपल्या कुटुंबाविरुद्धची तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी संपत चव्हाण हे ठाणेदार म्हणून कर्तव्यावर होते. त्यावेळी संपत चव्हाण याने तू माझ्याशी मैत्री केली तर तुझे प्रकरण मार्गी लावतो असे म्हणत ओळख वाढवली. (Wardha Crime News)
यानंतर चव्हाण हा तिच्या घरी गेला. त्यावेळी ती घरात एकटीच असल्याची संधी साधून संपत चव्हाण याने तिच्याशी शारीरिक सबंध प्रस्थापित केले. संपत चव्हाण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने एक व्हिडिओ तयार केल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. त्या आधारे त्याने सतत ब्लॅकमेल करुन अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संपत चव्हाण याने एप्रिल 2022 पर्यंत तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले.
या प्रकाराला कंटाळून तरुणीने आरोपी संपत चव्हाण याच्या पत्नीला तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला.
त्यावेळी आरोपीच्या पत्नीने पतीची बाजू घेत तिलाच फसवण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान संपत चव्हाण याची वर्धा येथे बदली झाली. त्याच्या जागेवर कैलास फुंडकर
(Police Inspector Kailas Phundkar) यांची नियुक्ती करण्यात आली.
21 डिसेंबर 2022 रोजी तरुणीने तत्कालीन ठाणेदार चव्हाण विरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
परंतु पोलिसाविरुद्ध तक्रर असल्याने तुझी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे पाठवली जाईल, असे तरुणीला सांगण्यात आले.
त्यानंतर तरुणीने पोलीस अधीक्षकांना ईमेल द्वारे तक्रार केली.
परत तक्रार झाल्याने चव्हाण याच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची पुढील चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन (SP Nurul Hasan) यांनी सांगितले.
Web Title : Wardha Crime News | police inspector rape a girl who came to complain at hinganghat police station in wardha district
हे देखील वाचा :
Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना