बहुजननामा ऑनलाईन टीम – फिट आणि निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन के (Vitamin K) खुप आवश्यक आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनाशी लढण्यात सुद्धा व्हिटॅमिन के आवश्यक आहे. हे हार्ट आणि फुफ्फुसांच्या मांसपेशींचे इलास्टिक फायबर कमी होऊ देत नाही. व्हिटॅमिन के (Vitamin K) चे फायदे आणि ते कोणत्या पदार्थातून मिळते जाणून घेवूयात…
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
व्हिटॅमिन के या पदार्थांमधून मिळते…
आहारात डेयरी प्रॉडक्ट, जसे की दूध, दही, पनीर यांचा समावेशक करा. तसेच पोर्क, चिकन, अंड्याचा पिवळा भाग, चीज, सॉफ्ट चीज, पालक, ब्रोकली, स्प्राउट यामध्ये व्हिटॅमिन के भरपूर आढळते.
शरीराला होणारे फायदे
1 – हार्ट, धमण्या आणि फुफ्फुस मजबूत होण्यास मदत करते. लवचिकता येते.
2 – इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा वापर होाते. सूज, इतर आजार दूर राहतात.
3 – व्हिटॅमिन के अँटीऑक्सीडेंट म्हणून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते, जे सूज येण्यासाठी कारणीभूत ठरते.
4 – व्हिटॅमिन के ब्लडमध्ये क्लॉटिंग होऊ देत नाही. कोरोनाच्या अनेक गंभीर रूग्णांमध्ये व्हिटॅमिन के ची कमतरता दिसून आली आहे.
5 – व्हिटॅमिन-के हाडांमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिज लवण पोहचवण्याचे काम करते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.
Web Titel : vitamin k health benefits of vitamin k food list with vitamin k deficiency and function
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update