पुणे : बहुजननामा ऑनलाईन – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ (Vision Cup” ODI (50 Overs) Cricket Tournament) अजिंक्यपद एकदिवसीय (५० षटके) क्रिकेट स्पर्धेत सिंहगड इलेव्हन संघाने सिंधुदूर्ग इलेव्हन संघाचा २४१ धावांनी सहज पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (Vision Cup” ODI (50 Overs) Cricket Tournament)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात कुणालसिंग चौहान याच्या ८४ धावांच्या जोरावर सिंहगड इलेव्हन संघाने सिंधुदूर्ग इलेव्हन संघाचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सिंहगड इलेव्हन संघाने ४५ षटकामध्ये ३५४ धावांचा डोंगर उभा केला. कुणालसिंग चौहान याने ७१ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. हेमंत वाईकर याने ५५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा जमविल्या. कुणाल आणि हेमंत यांनी १०८ चेंडूत १३६ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. कृष्णा पाटील (२९ धावा) आणि शाम यादव (२६ धावा) यांनी धावांचे योगदान दिले.
या आव्हानासमोर सिंधुदूर्ग इलेव्हनचा डाव २७.१ षटकात ११३ धावांवर मर्यादित राहीला. शुभम नायडू (२८ धावा) आणि निलेश माळी (१९ धावा) यांनी संघाकडून प्रतिकार केला. कर्णधार स्वप्निल आचेगावे (३-१९), यश सुर्यवंशी (३-२७) आणि शाम यादव (२-३६) यांनी अचूक गोलंदाजी करून सिंधुदूर्ग संघाचा डाव मर्यादित ठेवला. (Vision Cup” ODI (50 Overs) Cricket Tournament)
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी आणि शंतनू आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या सिंहगड इलेव्हन संघाला तसेच उपविजेत्या सिंधुदूर्ग इलेव्हन संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू शाम यादव (सिंहगड इलेव्हन); सर्वोत्कृष्ट फलंदाज हेमंत वाईकर (सिंहगड, २३० धावा); सर्वोत्कृष्ट गोलंदाज ओंकार मोगलगिद्दीकर (सिंधुदूर्ग इलेव्हन , १५ विकेट) अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सिंहगड इलेव्हनः ४५ षटकात ९ गडी बाद ३५४ धावा (कुणालसिंग चौहान ८४ (७१, १३ चौकार, २ षटकार), हेमंत वाईकर ६७ (५५, ८ चौकार, ४ षटकार), कृष्णा पाटील २९, शाम यादव २६, ओंकार पेटकर ३-२३, आशिष शिंगणे ३-२५, निलेश माळी २-८२);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी हेमंत आणि कुणाल यांच्यात १३६ (१०८) वि.वि. सिंधुदूर्ग इलेव्हनः २७.१ षटकात १० गडी बाद ११३ धावा (शुभम नायडू २८, निलेश माळी १९, स्वप्निल आचेगावे ३-१९, यश सुर्यवंशी ३-२७, शाम यादव २-३६); सामनावीरः कुणालसिंग चौहान;
Web Title :- Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘Vision Trophy’ Championship Cricket Tournament; Sinhagad XI won the title!
हे देखील वाचा :
Chandrashekhar Bawankule | ‘तावडे समितीचा अहवाल खरा आहे का?’ बावनकुळे म्हणाले -‘भाजपात अशी कोणतीही…’