नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीशी युद्धा लढत असलेल्या भारतासोबत आता संयुक्त अरब अमीरात (युएई) सुद्धा खांद्याला खांदा लावून उभा आहे. कोरोनाच्या कठिण काळात भारताच्या समर्थनार्थ युएईने सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफाला तिरंग्याच्या रंगात प्रकाशित केले.
भारतात कोरोनाची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. अशावेळी सौदी अरब, युके, अमेरिकेसह अनेक देश भारतासोबत उभे असल्याचे दिसून येत आहेत. युएईने भारताला समर्थन आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी बुर्ज खलीफाला तिरंग्याच्या रंगात रंगवले. या सर्वात उंच इमारतीवरून #StayStrongIndia चा मेसेज दिला गेला.
#WATCH | United Arab Emirates: Burj Khalifa lights up with tricolour, to show support to India, amid the prevailing COVID19 situation in the country
(Video source: Embassy of India, Abu Dhabi, UAE) pic.twitter.com/Btk2eLhAzy
— ANI (@ANI) April 25, 2021
रविवारी रात्री उशीरा युएईमध्ये भारतीय दूतावासाकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला. व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले होते की, भारत कोरोनाविरूद्ध भीषण युद्ध लढत आहे, अशावेळी त्याचा मित्र युएई आपल्या शुभेच्छा पाठवत आहे की, सर्वकाही लवकर ठिक व्हावे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कशाप्रकारे बुर्ज खलीफा इमारत तिरंग्याच्या लाईटमध्ये झगमगत आहे. इमारतीवर तिरंग्याशिवाय #StayStrongIndia टॅग सुद्ध दिसत आहे.
बुर्ज खलीफाचे दृश्य
भारतात कोरोनाने स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. या लढाईत व्हॅक्सीन एक मोठे शस्त्र आहे परंतु अमेरिकेकडून व्हॅक्सीन बनवण्यासाठी ज्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे, त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता त्याच निर्णयावर नरमाई दाखवत अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे.
रविवारी अमेरिकेकडून सांगण्यात आले की, भारताला व्हॅक्सीन बनवण्यासाठी कच्चा माल सप्लाय करतील.