बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारला विचारल्याशिवाय राज्यांनी कन्टेंन्मेंट झोनबाहेर स्वरुपातील लॉकडाउन लावता येणार नाही, असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत. त्यामुळे आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्यांना स्थानिक पातळीवर लॉकडाउन करता येणार नाही.
केंद्राने अनलॉक 4 ची प्रक्रिया आणि नियमावली जाहीर केली. यामध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यास 7 सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. तर सामाजिक, सांस्कृतीक, धार्मिक, शैक्षणिक, खेळ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. 21 सप्टेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. अनलॉक 3 चा टप्पा 31 ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक 4 मध्ये नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. अनलॉक 4 मध्ये चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे.