बहुजननामा ऑनलाइन टीम – नागिन 3 या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास जागा बनवणारी अॅक्ट्रेस सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) इडंस्ट्रीतील सुंदर अॅक्ट्रेसपैकी एक आहे. सुरभी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आजवर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा सुरभीनं बोल्ड फोटोशुटमुळं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सुरभीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सुरभी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड अवतार आवडला आहे. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी फोटोंवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
सुरभीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं फक्त टॉवेल गुंडाळला आहे. तिचे हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. आरशा समोर पोज देत तिनं फोटोशुट केलं आहे.
https://www.instagram.com/p/CH9qJUDsWWY/
सुरभीच्या वर्कफ्रंट बोलायचं झालं तर तिनं कुबूल है या टीव्ही मालिकेतून इंडस्ट्रीत पाऊल टाकलं होतं. यानंतर तिनं अनेक मालिकेत काम केलं आहे. सुरभीनं नागिन 3 आणि नागिन 4 मालिकेतही भूमिका साकारली आहे. सुरभी इक कुडी पंजाब दी, मंडे पटियाला दे यांसारख्या पंजाबी सिनेमात झळकली आहे. याशिवाय तिनं पंजाबी सीरीजमध्येही काम केलं आहे. परंतु तिला अॅक्ट्रेस म्हणून खरी ओळख कुबूल है आणि नागिन या मालिकेतून मिळाली.